Followers

Sunday, May 30, 2021

९६ कुळी

 लेख भावनिक आहे पण माझे साधे प्रश्न,

९६ कुळी आहे तरी गेल्यावेळी आरक्षण भेटत होते. मग आता का भेटत नाही.?
आरक्षण नाकारले हा खोटा अहंकाराचा विषय कसा काय होऊ शकतो.?
आजच्या या व्यवस्थेला निर्माण कोणीही केले असेल पण वंशपरंपरेने उच्च वर्गीय असणारांच्या त्यागावरच ही व्यवस्था उभी राहीली आहे, मग तो ९६ कुळी असेल नाहीतर ९२ कुळी.. घाटावरील असेल नाहीतर कोकणातील असेल नाहीतर मराठवाडा विदर्भातील असेल.
या व्यवस्थेला भूदान चळवळीला जमीनी कोणी दिल्या,? धरणे बांधली सर्वात जास्त जमीनी कोणाच्या गेल्या.? औद्योगिक वसाहतीला कारखानदारीला शैक्षणिक संस्था रस्ते हायवे सर्वात जास्त जमीनी कोणाच्या गेल्या.? या सर्वांचा लाभ फक्त ९६ कुळींनी किंवा फक्त मराठ्यांनीच घेतला काय.?
व्यवस्थेने मागितले तसे मराठ्यांनी दिले आहे. मग त्याच्याकडून हे सगळे घेणारी व्यवस्था त्याच्या आजच्या परीस्थितीत त्याला का साथ देत नाही.
९६ कुळी आहे तरीही ती व्यवस्था आरक्षण देत होती आणि आता तुम्ही म्हणता तसे मुंबईत झोपडपट्टीत राहतो आणि गावाला आल्यावर दुसऱ्याच्या लग्नात फेटा घालून ताल मिरवतात. म्हणजे झोपडपट्टीत राहूनही अजूनही लग्नात फेटा घालून मिरवतात म्हणून आरक्षण देत नाही काय.?
अशी थट्टा सेम पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने भर कार्यक्रमात केली होती. तुम्हीही तेच करताय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्याच्या पक्षाची भूमिका काय आहे तेही जगजाहीर आहे, आणि तुम्ही नेमके तेच कॉपी केले आहे, काय योगायोग आहे.?
म्हणजे व्यवस्था मराठ्यांकडून घेत होती तोपर्यंत कोणीच असे नाही बोलले, व्यवस्थेकडुन मराठ्यांनी काही अपेक्षा ठेवल्या कि सगळे गेले अन राहिलेल्या फेट्यावरही तुमचा आक्षेप का.?
आज तुम्हाला "मराठा" शब्द नागडी आर्थिक व्यवस्था झाकायला वापरला जातो असे सुचतेच कसे. म्हणजे आर्थिक परिस्थिती बिघडली म्हणून आम्ही जाहीर करावे कि काय आता आम्ही मराठा राहिलो नाही म्हणून..
येथे आरक्षणाचा विषय आहे. त्यादृष्टीने विचार करा एकदा कि मराठ्यांनी आजवर काय दिले आहे आणि आज त्याच्या पडत्या काळात त्याला काय मिळते आहे.. आजवर कोणत्याही व्यवस्थेत मग ती सरंजामशाही असेल राजेशाही असेल नाहीतर लोकशाही असेल मराठ्यांनी स्वतःचे सर्वस्व दिलेय, म्हणूनच फेटा मिरवायची त्याला अजूनही ती रक्तातील हौस आहे. ही हौस बाकी कुठे दिसते का.?
अजून खुप काही आहे..
सध्या एवढ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे कि ९६ कुळी आहे तरी आरक्षण भेटत होते, कोण देणारे होते ते देत होते, मग आता का नाही देत आरक्षण..?

No comments:

Post a Comment